Virat Kohli Golden Duck: पहिलाच चेंडू आणि बाद, आयपीएलमध्ये विराटची बॅट चालेना

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम

Updated: Apr 19, 2022, 09:35 PM IST
Virat Kohli Golden Duck: पहिलाच चेंडू आणि बाद, आयपीएलमध्ये विराटची बॅट चालेना title=

IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामातला खराब फॉर्म कायम आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या (LSG) मॅचमध्ये विराट शुन्यावर बाद झआला. पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेच्या दुष्मंथा चमीराने विराटला बाद केले. त्याचा झेल दीपक हुडाने घेतला. आयपीएलमध्ये पाच वर्षानंतर कोहली शून्यावर बाद झाला आहे.

या हंगामात एकही अर्धशतक नाही
या हंगामात विराटला आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. विराटने पंजाब किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद 41, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 12, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 5, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या चौथ्या सामन्यात 48, चेन्नईविरुद्धच्या पाचव्या सामन्यात 1 धाव आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सहाव्या सामन्यात 12 धावा केल्या.

कोहली सातव्यांदा शुन्यावर बाद
कोहली शेवटचा एप्रिल 2017 मध्ये कोलकाताविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. विराट आतापर्यंत सातव्यांदा शुन्यावर बाद झाला आहे. यात चार वेळा तो पहिल्याच चेंडूवर (Golden Duck) पॅव्हेलिअनमध्ये परतला आहे. सर्वाधिक शुन्यावर बाद झालेल्या खेळाडूंमध्ये पियुष चावला, हरभजन सिंग, मनदीप सिंग, पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू आणि रोहित शर्मा यांची नावं आहेत. 

काय म्हणाले आरसीबीचे प्रशिक्षक?
आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांनी कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलताना कोहली सध्या बॅडपॅचमधून जात असल्याचं म्हटलं आहे. त्याला गेल्या काही सामन्यात मोठी धावसंख्या करता आलेली नाही, पण लवकरच तो आपल्या फॉर्ममध्ये परतेल असं बांगर यांनी म्हटलं आहे.