Yuzvendra Chahal हॅटट्रिकवर पत्नी धनश्रीने असं केलं सेलिब्रेशन की, चहलही पाहतच राहिला

Dhanashree varma Celebration | युजवेंद्र चहलच्या शानदार हॅटट्रिकनंतर पत्नी धनश्री वर्माने असं केलं भन्नाट सेलिब्रेशन

Updated: Apr 19, 2022, 05:49 PM IST
Yuzvendra Chahal हॅटट्रिकवर पत्नी धनश्रीने असं केलं सेलिब्रेशन की,  चहलही पाहतच राहिला title=

RR vs KKR : राजस्थान संघाने युजवेंद्र चहलच्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर कोलकातावर दणदणीत विजय मिळवला. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने सलग श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना माघारी पाठवले. ज्यामुळे मोठ्या टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या कोलकाता संघाला मोठा धक्का बसला. (Dhanashree varma Celebration on Yuzvendra Chahal Hattrick in IPL 2022)

राजस्थानकडून जोस बटलरने शतक (jos buttler century) ठोकलं. ज्यामुळे संघाला २१७ धावांपर्यंत मजल मारता आली. युजवेंद्र चहलने यंदाच्या हंगामातील पहिली हॅटट्रिक घेतली आहे. त्याच्या या हॅटट्रिक नंतर त्याची पत्नी धनश्री वर्मा-चहलने देखील जोरदार सेलिब्रेशन केलं.

कोलकाताकडून सुनील नरेन शुन्यावर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि आरोन फिंच यांनी १०७ धावांची भागीदारी केली. फिंचने ५८ धावा केल्या. श्रेयस अय्यर चांगली कामगिरी करत असताना त्याला युजवेंद्र चहलने आऊट केलं. त्याने ५१ बॉलमध्ये ७ फोर आणि ४ सिक्सच्या मदतीने ८५ धावा ठोकल्या. युजवेंद्र चहलच्या या हॅटट्रिकनंतर सामना फिरला. 

युजवेंद्र चहलने ४ ओव्हरमध्ये ४० रन देत 5 विकेट घेतले. राजस्थानकडून देवदत्त पडिकलने २४, संजू सॅमसनने ३८, शिमरॉन हेटमायरने २६ रन केले. जोस बटलरने ५९ बॉलमध्ये शतक ठोकले