मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) रवींद्र जाडेजाकडे (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. जाडेजा महेंद्रसिंह धोनी वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेन्नईला जाडेजाच्या नेतृत्वात पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून दुसऱ्या म्हणजेच नवव्या क्रमांकावर आहे. (ipl 2022 ravindra jadeja development as captain very difficult while playing under dhoni says simon doull)
जाडेजाच्या नेतृत्वावरुन अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चेन्नईच्या पराभवासाठी कुठेतरी धोनीलाही (Mahendra Singh Dhoni) जबाबदार ठरवलं जात आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डूलने (simon doull) धोनीवर टीका केली आहे.
डूलने जाडेजा कॅप्टन असतानाही धोनीच्या पडद्यामागून कॅप्टन्सी करण्याच्या स्वभावावर टीका केली आहे. "धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळत असताना जाडेजाचा विकास होणं अवघड आहे. आतापर्यंतचे सामने पाहून हाच अंदाज बांधता येऊ शकतो", असं डूल म्हणाला. डूलने एका कार्यक्रमात याबाबत हे वक्तव्य केलं.
सायमन डूलची क्रिकेट कारकिर्द
सायमन डूलने न्यूझीलंडचं 32 कसोटी आणि 42 वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. डूलने 98 कसोटी आणि 36 वनडे विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टेस्टमध्ये 570 आणि वनडेमध्ये 172 धावा केल्या आहेत.