IPL 2022, KKR vs MI | कोलकाताने टॉस जिंकला, मुंबईमध्ये स्टार खेळाडूची एन्ट्री

केकेआरने टॉस जिंकला आहे. कॅप्टन श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Apr 6, 2022, 07:33 PM IST
IPL 2022, KKR vs MI | कोलकाताने टॉस जिंकला, मुंबईमध्ये स्टार खेळाडूची एन्ट्री title=

पुणे : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 14 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला थोड्याच वेळात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडिममध्ये (Gahunje Stadium) सुरुवात होणार आहे. केकेआरने टॉस जिंकला आहे. कॅप्टन श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई पहिले बॅटिंग करणार आहे. (ipl 2022 match 14 kkr vs mi kolkata knight riders win toss and elect to bowling)

दोन्ही संघात 2 बदल

या सामन्यात दोन्ही संघांनी 2 प्रत्येकी बदल केले आहेत. कोलकाताने टीम साउथीच्या जागी पॅट कमिन्सला संधी दिली आहे. तर शिवम मावीच्या जागी वेगवान गोलंदाज रासिख सलामला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. 

तर दुसऱ्या बाजूला मुंबई टीममध्ये स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादवचं पुनरागमन झालं आहे. सूर्याला अनमोलप्रति सिंहच्या जागी संधी दिली आहे. तर 'बेबी एबी' म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसला पदार्पणाची संधी मिळाली आहे. ब्रेविसला टीम डेव्हिडच्या जागी घेतलं आहे. 

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डेनियल सॅम्स , डेवाल्ड ब्रेविस, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टिमाल मिल्स आणि बासिल थम्पी. 

केकेआर प्लेइंग इलेव्हन :  श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर,  अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम आणि वरुण चक्रवर्ती.