मुंबई : IPL 2022 चे सामने अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. 26 मार्चला IPL 2022 च्या पंधराव्या हंगामातील पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. तर मुंबई संघाचा पहिला सामना 27 मार्च रोजी असणार आहे. आता पलटण तयार आहे. कसोटी सीरिज संपल्यानंतर खेळाडू IPL च्या तयारीला लागले आहेत.
रोहित शर्मा-बुमराह मुंबई संघासोबत जोडले गेले आहेत. या खेळाडूंचं ट्रेनिंग सुरू झालं आहे. रोहित शर्मा आपली गोंडस मुलगी समायरला घेऊन हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. बुमराह आणि रोहित श्रीलंकेविरुद्धची कसोटी सीरिज संपवून मुंबई संघासोबत जोडले गेले आहेत.
याच दरम्यान एक मुंबई संघाला धक्का म्हणजे सूर्यकुमार यादवला दुखापत असल्याने तो पहिले काही सामने खेळणार की नाही याबाबत शंका आहे. तर दुसरीकडे मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण NCA ने विकेटकीपर इशान किशनला क्लीन चिट दिली आहे.
इशान किशनला एनसीएकडून फिटनेस सर्टिफिकेट मिळालं असून आता तो लवकरच संघासोबत जोडला जाणार आहे. बंगळुरूहून तो मुंबईत विामानाने येणार आहे. इशान किशनला बायोबबलमध्ये राहावं लागणार आहे.
ट्रेनिंगमध्ये जहीर खान, जयवर्धने, शेन बॉन्ड, रोबिन सिंह, किरण मोरे , विनय कुमार पोहोचले आहेत. बुमराह आणि रोहित शर्मा देखील हॉटेलवर पोहोचले आहेत.
A normal working day in the #MumbaiIndians camp!
Presenting an up close and personal account as we get set for an exciting new season #OneFamily MI TV pic.twitter.com/LYjBrEuoWo
— Mumbai Indians (@mipaltan) March 16, 2022