RCB ट्रॉफी जिंकणार? एकही सामना न खेळणारा खेळाडू ठरणार लकी

आरसीबी (RCB) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) क्वालिफायर-2 मध्ये (Qualifier 2) पोहचली आहे.

Updated: May 27, 2022, 05:37 PM IST
RCB ट्रॉफी जिंकणार? एकही सामना न खेळणारा खेळाडू ठरणार लकी title=

मुंबई : आरसीबी (RCB) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) क्वालिफायर-2 मध्ये (Qualifier 2) पोहचली आहे. आरसीबीला या मोसमात आतापर्यंत नशिबाची साथ मिळाली आहे. यंदा आरसीबीला पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याची मोठी संधी आहे. आरसीबी फाफ डू प्लेसिसच्या कॅप्टन्सीखाली ट्रॉफीपासून फक्त 2  पाउल दूर आहे. दरम्यान आरसीबीमधील एक खेळाडू हा आरसीबीसाठी लकी खेळाडू ठरु शकतो. (ipl 2022 mumbai indians chennai super kings and sunrisers hyderabad team win ipl trophy when karn sharma in his team squad)

या खेळाडूने आयपीएलमध्ये ज्या ज्या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे, तो तो संघ आतापर्यंत चॅम्पियन ठरला आहे. या क्रिकेटरने एकूण 3 संघाचं प्रतिनिधित्व केलंय. या तिन्ही संघानी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आपण बोलतोय ते (Karn Sharma) कर्ण शर्माबद्दल. आरसीबीने कर्णला या मोसमात एकदाही खेळण्याची संधी दिली नाही. मात्र तरीही तो आपल्या टीमसाठी नशिबवान सिद्ध होऊ शकतो. 

कर्णला आरसीबीने 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. याआधी कर्णने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व केलंय. या तिन्ही संघांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 

हैदराबाद 2016 आणि मुंबई 2017 मध्ये आयपीएल चॅम्पियन ठरली. या दोन्ही वेळेस कर्ण हा या दोन्ही संघांमध्ये होता. तर यानंतर कर्ण हा 2018 ते 2021 या दरम्यान चेन्नई टीममध्ये होता. त्यावेळेस चेन्नईने 2018 आणि 2021 मध्ये ट्रॉफी जिंकली होती.

साखळी फेरीत मुंबईने दिल्लीचा पराभव केल्याने आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरली. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आरसीबी विरुद्ध राजस्थान आमनेसामने भिडणार आहेत. त्यामुळे आता या सामन्यात कर्ण शर्मा आरसीबीसाठी लकी ठरतो का, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.