Mega Auction: IPL 2022 मध्ये Aaron Finch कडे येणार कर्णधारपद, 3 टीम लावणार बोली?

Aaron Finch च्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया प्रथमच आयसीसी टी 20 वर्ल्ड कपचा चॅम्पियन बनला. त्याचा फायदा त्याला IPL 2022 च्या Mega Auction साठी मिळू शकतो.

Updated: Nov 15, 2021, 11:32 AM IST
Mega Auction: IPL 2022 मध्ये Aaron Finch कडे येणार कर्णधारपद, 3 टीम लावणार बोली? title=

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपमच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बाजी पलटवत विजय मिळवला आहे. फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. IPL मध्ये खराब कामगिरी करणाऱ्या वॉर्नरने अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून देण्यात वॉर्नरचाही मोलाचा वाटा आहे. ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. 

ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कपचा विजेता ठरला आहे. या विजयाचा फायदा आता आयपीएलसाठी होऊ शकतो असा कयास लावला जात आहे. 2022 मध्ये दोन नवे संघ IPL मध्ये येणार आहेत. त्यामुळे 2022 मध्ये एकूण 10 संघांमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत. वॉर्नरला प्रतिस्पर्धी आणि 3 संघांना एक उत्तम कर्णधार म्हणून नवीन पर्याय मिळाला आहे.

फिंचला मिळणार टी 20 वर्ल्ड कप जिंकल्याचा फायदा 

Aaron Finch च्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया प्रथमच आयसीसी टी 20 वर्ल्ड कपचा चॅम्पियन बनला. त्याचा फायदा त्याला IPL 2022 च्या Mega Auction साठी मिळू शकतो.3 टीम फिंचला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. 

लखनऊ

टी 20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर Aaron Finch चा कर्णधार म्हणून एक वेगळाच कॉन्फिडन्स वाढला आहे. डेव्हिड वॉर्नरला प्रतिस्पर्धी आणि लखनऊसाठी नवा कर्णधार म्हणून फिंचची निवड केली जाऊ शकते. यासाठी लखनऊ संघ फिंचवर मोठी बोली लावू शकतो अशी माहिती मिळाली आहे.

अहमदाबाद

सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाची मालकी 5166 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. लखनौप्रमाणे तोही नवीन संघ आणि सर्वोत्तम कर्णधाराच्या शोधात आहे. एरोन फिंचच्या बळावर ही फ्रँचायझी आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करू शकते.

बंगळुरू

विराट कोहलीनं नुकतंच RCB चं कर्णधारपद सोडण्याबाबत घोषणा केली. त्यानंतर आता पुढचा कर्णधार कोण असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. बंगळुरूचा संघ आतापर्यंत एकदाही या स्पर्धेचा चॅम्पियन बनलेला नाही. अशा परिस्थितीत RCB एरोन फिंचचा कर्णधार म्हणून विचार करू शकते.