IPL 2022 | गुजरातच्या पहिल्या मॅचआधीच गळतीचा नारळ फुटला, या खेळाडूची स्पर्धेतून माघार

यंदा एकूण 10 संघ मैदानात स्पर्धेसाठी उतरणार आहेत. यामध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. 

Updated: Mar 1, 2022, 06:40 PM IST
IPL 2022 | गुजरातच्या पहिल्या मॅचआधीच गळतीचा नारळ फुटला, या खेळाडूची स्पर्धेतून माघार  title=

मुंबई : आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. IPL सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच आता गुजरात संघाला मोठा धक्का बसला आहे. IPL सामन्याआधी गुजरात संघातील एक क्रिकेटपटून माघार घेतली आहे. 

2 कोटीच्या खेळाडूनं दिला दणका
गुजरात संघाचा ओपनर जेसन रॉय याला 2 कोटी रुपयांनी संघात समाविष्ट करून घेतलं होतं. जेसन रॉयने गुजरात संघ सोडल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या संघासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. 

पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या गुजरात संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहे. एकूण 70 सामने होणार असून त्यातील 15 सामने पुण्यात खेळवले जाणार तर उर्वरीत सामने मुंबईमध्ये खेळवले जाणार आहेत. 

यंदा एकूण 10 संघ मैदानात स्पर्धेसाठी उतरणार आहेत. यामध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. दुसरं वैशिष्ट्यं म्हणजे यंदा टायटल स्पॉन्सर टाटा असणार आहे. त्यामुळे यंदाचं आयपीएल अनेक अर्थान खास असणार आहे. 

 14 व्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्स संघाने ट्रॉफी जिंकली होती. चेन्नईनं गेल्या 14 वर्षात चौथ्यांदा विजेतेपदाची ट्रॉफी मिळवली आहे. आता पंधराव्या हंगामाची प्रतिक्षा सर्वांनाच आहे.