क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, पाहा IPL 2022 संदर्भातील मोठी अपडेट

मेगा ऑक्शननंतर IPL 2022 संदर्भात सर्वात मोठी अपडेट, पाहा सविस्तर

Updated: Feb 21, 2022, 08:02 PM IST
क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, पाहा IPL 2022 संदर्भातील मोठी अपडेट title=

मुंबई : यंदा परदेशातील काही खेळाडूंची उणीव भासली तर भारतातील अनेक खेळाडूंची चांदी ऑक्शनच्या निमित्तानं झाली आहे. यंदा 10 टीम आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे स्पर्धा अगदी चुरशीची होणार आहे. ऑक्शन संपल्यानंतर सर्वांना प्रतिक्षा होती ती म्हणजे संपूर्ण शेडयुलची.

आयपीएल 2022 चे सामने 27 मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती BCCI कडून देण्यात आली होती. मात्र संपूर्ण शेड्युल आता पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे यंदा मुंबई आणि पुण्यामध्ये सामने खेळवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत पुढच्या आठवड्यात अधिकृत घोषणा होऊ शकते. 

यंदा 10 संघात 72 सामने खेळवले जाणार आहेत त्यामुळे स्पर्धा अधिक चुरशीची असेल यामध्ये शंकाच नाही. शिवाय कर्णधारही काही संघाचे बदलले आहेत. त्यामुळे यावेळी काय नव्या स्ट्रॅटजी आखल्या जाणार हे पाहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. चेन्नई आणि मुंबईचा रेकॉर्ड तोडण्यात कोण यशस्वी होणार? RCB ची ट्रॉफीची वाटचाल पुन्हा एकदा सोपी होणार का? याकडेही सर्वांच्या नजरा असणार आहेत. 

आयपीएलचा 2022 चा हंगाम अनेक अर्थाने खास असणार आहे. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे. 2022 पासून टाटा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर असतील.. इतकच नाही तर आयपीएलला लवकरच नवीन मीडिया प्रायोजकही मिळणार आहे, कारण स्टारकडे असलेले आयपीएलचे हक्कही 2022 पर्यंत संपणार आहेत.