IPL सुरू होण्यापूर्वी दिल्ली संघाला धक्का, 5 खेळाडू टीममधून बाहेर पण का?

IPL 2022 सुरू होण्यापूर्वीच दिल्ली संघाला मोठा धक्का

Updated: Mar 14, 2022, 04:51 PM IST
IPL सुरू होण्यापूर्वी दिल्ली संघाला धक्का, 5 खेळाडू टीममधून बाहेर पण का? title=

मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्याच वेळी दिल्ली संघासाठी एक मोठी बातमी येत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच 5 खेळाडू संघातून बाहेर झाले आहेत. एक दोन नाही तर तब्बल 5 खेळाडू एक आठवड्याहून अधिक काळ आयपीएलचे सामने खेळू शकणार नाहीत. 

दिल्लीचे 5 स्टार खेळाडू या कारणाने राहणार बाहेर
जसजशी आयपीएलची तारीख जवळ येत आहे तसं चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र वेगवेगळ्या संघांचं टेन्शन वाढलं आहे.  डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, एनरिख नॉर्खिया, मुस्तफिजुर रहमान आणि लुंगी एनगिडी यासारखे दिग्गज खेळाडू आयपीएलमधील एक पहिला आठवडा खेळणार नाहीत. हे खेळाडू सुरुवातीचे सामने खेळणार नाहीत. 

एनरिक नॉर्खिया दुखापतीमुळे त्रस आहे. त्यामुळे त्याला संघामध्ये परण्यासाठी वेळ लागणार आहे. दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे ते खेळाडू पहिला आठवडा मैदानात आयपीएलचे सामने खेळताना दिसणार नाहीत. 

डेव्हिड वॉर्नर दिल्ली संघातून पहिले काही सामने खेळणार नाही. त्यामुळे आता वॉर्नरशिवाय दिल्लीला पहिले सामने खेळण्यात अडचणी येऊ शकतात. 

दिल्ली संघाचे खेळाडू : 
ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिक नोरखिया, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजूर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेबर, डेव्हिड वॉर्नर, कमलेश नागरकोटी, सरफराज खान, मिचेल मार्श, केएस भरत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन सकारिया, ललित यवत. , रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी एनगिडी, टिम सेफर्ट, विकी ओस्तवाल.