IPL 2022 | चेन्नई सुपर किंग्सचा Deepak Chahar 15 व्या मोसमाला मुकणार?

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार बॉलर दीपक चाहर (Deepak Chahar) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) खेळणार की मुकणार हे अवघ्या 1 ते 2 दिवसांमध्ये ठरणार आहे.    

Updated: Mar 17, 2022, 06:13 PM IST
IPL 2022 | चेन्नई सुपर किंग्सचा Deepak Chahar 15 व्या मोसमाला मुकणार? title=

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार बॉलर दीपक चाहर (Deepak Chahar) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) खेळणार की मुकणार हे अवघ्या 1 ते 2 दिवसांमध्ये ठरणार आहे. चेन्नई फ्रँचायजीचे सीईओ काशी विश्वनाथन (Kashi Vishwanathan) यांनी एका वेबसाईटसोबत बोलताना याबाबतची माहिती दिली.  दीपकला वेस्ट इंडिया विरुद्धच्या टी 20 मालिकेदरम्यान दुखापत झाली होती.  (ipl 2022 csk chennnai super kings faster bowler deepak chahar waiting to fitness update nca)
  
दीपकला हॅम्स्ट्रींग दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे दीपकला किमान 6-8 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागू शकतं. तसंच दीपकला या दुखापतीमुळे या 15 व्या मोसमाला मुकावंही लागू शकतं. दीपकला किमान आयपीएलच्या पहिल्या टप्प्यापर्यंत बाहेर बसावं लागू शकतं. 

सीईओ काशी विश्वनाथन काय म्हणाले? 

"आम्ही अजूनही दीपक चहरच्या दुखापतीबाबत एनसीए रिपोर्टची (National Cricket Acedmy) वाट पाहत आहोत.  दीपक लवकरच आमच्यासोबत जोडला जाईल, अशी आशा आहे.  दीपकच्या जागी बदली खेळाडू घेण्याचा आमचा विचार नाही.  एक-दोन दिवसांमध्ये एनसीएचा रिपोर्ट येईल, त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल", असं विश्वनाथन म्हणाले. 

टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर बंगळुरुतील एनसीएमध्ये जावं लागतं. एनसीएत दुखापतीवर मेहनत घेऊन फिटनेस टेस्ट द्यावी लागते. या फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच खेळाडूला सामने खेळण्याची अधिकृत परवानगी मिळते. 

त्यामुळे आता येत्या काही दिवसात दीपकला पर्यायाने चेन्नईला दिलासा मिळणार की झटका, हे स्पष्ट होईल.