IPL 2022, CSK Captain | धोनीने कॅप्टन्सी सोडली, आता चेन्नईचा पुढचा कर्णधार कोण?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL 2022)  चेन्नईच्या महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Mar 24, 2022, 03:18 PM IST
IPL 2022, CSK Captain | धोनीने कॅप्टन्सी सोडली, आता चेन्नईचा पुढचा कर्णधार कोण?  title=

मुंबई : क्रिकेट विश्वाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL 2022)  चेन्नईच्या महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना एकच धक्का बसला आहे. त्यामुळे आता धोनीनंतर चेन्नईच नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. दरम्यान धोनीनंतर चेन्नईचा कॅप्टन कोण असणार आहे, हे जाहीर केलंय. स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आता यापुढे चेन्नईची धुरा सांभाळणार आहे. (ipl 2022 csk chennai super kings ravindra jadeja is new captain after mahendra singh dhoni step down)
 
आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी चेन्नईची टीम  (CSK Team 2022 Players List)  : 

रवींद्र जडेजा (कॅप्टन), महेंद्र सिंह धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, अंबाती रायडू, केएम आसिफ, तुषार देशपांडे, दीपक चाहर, शिवम दुबे, महेश दीक्षाना, राजवर्धन हंगरकेकर, सिमरजीत सिंह, डेवोन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सेंटनर, एडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापति, मुकेश चौधरी आणि प्रशांत सोलंकी.