मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहेत. चेन्नई विरुद्ध कोलकाता पहिला सामना असणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी एक मोठी अपडेट हाती आली आहे. महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं आहे. चेन्नईचा नवा कर्णधार धडाकेबाज ऑलराउंडर खेळाडू रवींद्र जडेजा असणार आहे.
धोनीने अचानक कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली. यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र आता आणखी एक चर्चा रंगली आहे. यंदा धोनी शेवटचं आयपीएल खेळू शकतो. त्यानंतर धोनीवर वेगळी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चारवेळा आतापर्यंत आयपीएल संघाला जिंकवून दिलं आहे. चेन्नई संघाच्या सुरुवातीपासून धोनी कर्णधारपदाची जबाबदारी पाहात आहे. आता नुकतंच त्याने कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. रवींद्र जडेजाच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
धोनी खरंच यंदा शेवटचं आयपीएल खेळणार का याबाबत अद्याप अधिकृत धोनीनं कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे याबाबत धोनी केव्हा बोलणार याकडेही सर्वांच्या नजरा आहेत.
धोनीने चेन्नईचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. धोनीने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.