Arjun Tendulkar | अर्जुनला मॅच खेळताना का पाहायचं नाही? स्वत: सचिनने सांगितलं कारण

सचिन तेंडुलकरनंतर त्याचा मुलगा अर्जुन  (Arjun Tendulkar)  आता क्रिकेट खेळतोय.  

Updated: Feb 26, 2022, 05:29 PM IST
Arjun Tendulkar | अर्जुनला मॅच खेळताना का पाहायचं नाही? स्वत: सचिनने सांगितलं कारण  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेटमधून निवृत्त होऊन 9 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र त्यानंतरही त्याचा फॅन फॉलोईंग अजूनही कायम आहे. सचिननंतर त्याचा मुलगा अर्जुन  (Arjun Tendulkar)  आता क्रिकेट खेळतोय. अर्जुनचा खेळ अजून बहरावा, असं सचिनला वाटतं. मात्र सचिन अर्जुनची मॅच पाहत नाही. जेव्हा अर्जुनची मॅच असते तेव्हा ती मी पाहत नाही, असं स्वत: सचिनने म्हटलं. (former team india cricketer sachin tendulkar revels his why not seen her son arjun tendulkar live matchs in stadium)

"अर्जुनला त्याच्या पद्धतीने खेळण्याचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्याची मॅच मी पाहत नाही, असं उत्तर सचिनने अर्जुनची मॅच का पाहत नाही, या प्रश्नावर दिलं. अर्जुन रणजी क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. तसेच आयपीएलमध्ये मुंबई फ्रँचायजीने अर्जूनला 30 लाख रुपयात 15 व्या हंगामासाठी आपल्या ताफ्यात घेतलं आहे. 

सचिन काय म्हणाला? 

"आई-वडिल जेव्हा आपल्या मुलाला खेळताना पाहायला जातात, तेव्हा मुलावर दबाव वाढतो, त्यामुळे मला अर्जुनला खेळताना पाहायचं नाहीये. अर्जुनला त्याच्या पद्धतीने खेळण्याचं स्वातंत्र्य मिळावं. तसंच त्याला जे करायचंय, त्यावर त्याने लक्ष केंद्रित करावं", असं सचिनने नमूद केलं.

"अर्जुनला त्याच्या खेळावर लक्ष द्यायचं आहे. मलाही कोणी पाहू नये, असं मला वाटायचं" असं सचिनने स्पष्ट केलं. "तसंच मला जर अर्जुनची मॅच पाहायची असेल, तर लपून छपून पाहू शकत. अर्जूनला समजणार ही नाही की मी तिथे आहे", असं सचिनने स्पष्ट केलं.