मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामाबाबत (IPL 2022) मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2022 च्या मोसमाचं आयोजन हे राज्यातील एकूण 4 स्टेडियममध्येच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच क्रिकेट चाहत्यांशिवाय सर्व सामने पार पडतील, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यामागचा उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (ipl 2022 15th season might be held in 4 stadiums in maharashtra without cricket fans bcci sources)
राज्यातील 4 स्टेडियममध्ये आयोजन
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 4 स्टेडियममध्ये 15 व्या मोसमातील सामने पार पडतील. राज्यात मुंबईत 2, नवी मुंबईत 1 आणि पुण्यात 1 असे एकूण 4 स्टेडियम आहेत. हे सर्व सामने मुंबईतील वानखेडे (Wankhede Stadium), बेब्रॉन (brabourne stadium आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील (D Y Patil Stadiun) स्टेडियममध्ये खेळवले जातील. तसेच जर गरज पडली तर पुण्यातील गहुंजेमधील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये (Gahunje Stadium) आयोजित केले जातील, असंही अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय.
चाहत्यांशिवाय सामने खेळवण्यात येणार
राज्यात सामने होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातवरण पाहायला मिळतंय. मात्र त्यांचा हिरमोड झालाय. यावेळेसही 15 व्या मोसमातील सर्व सामने हे क्रिकेट चाहत्यांशिवायच म्हणजेच बंद दाराआड खेळवण्यात येणार असल्याचंही म्हंटलं आहे. खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाचा कोणताही धोका संभवू नये, याची खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं म्हंटलं जात आहे.
15 व्या मोसमात 2 नवे संघ
दरम्यान या 15 व्या मोसमात आणखी थरार पाहायला मिळणार आहे. या हंगामात एकूण 2 नवे संघ जोडले गेले आहेत. अहमदादबाद आणि लखनऊ असं या दोन्ही संघांची नावं आहेत. टीम वाढल्याने अर्थात सामने वाढतील. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आणखी थरार पाहायला मिळणार आहे.
एकूण 1200 खेळाडूंकडून नोंदणी
लवकरच या मोसमासाठी लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी एकूण 1 हजार 214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. याबाबतची माहिची आयपीएल प्रशासनाने ट्विट करत दिली आहे.
#IPL2022 will be held in India without a crowd. Likely venues are Wankhede Stadium, Cricket Club of India (CCI), DY Patil Stadium in Mumbai & Pune if needed: Top sources in BCCI to ANI
— ANI (@ANI) January 22, 2022