VIDEO : 'गोली से भी तेज कोहली', फ्लाइंग विराटच्या फील्डिंगवर सारेच हैराण

विराट कोहलीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा 

Updated: Sep 30, 2021, 09:29 AM IST
VIDEO : 'गोली से भी तेज कोहली', फ्लाइंग विराटच्या फील्डिंगवर सारेच हैराण title=

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगलौर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात बुधवारी सामना झाला. बुधवारी IPL सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेली कॅच सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाली आहे. विराट कोहीने फ्लाइंग कॅच घेतली आहे. विराट कोहली जगातील टॉप फिल्डरमधील एक आहे. 

फ्लाइंग विराटची तेजदर्रार फील्डिंग

राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ख्रिस मॉरिसचा इतका जबरदस्त झेल घेतला. जो पाहून सगळेच स्तब्ध झाले. राजस्थान रॉयल्स बॅटिंग करत असताना फलंदाज ख्रिस मॉरिसने ऑफसाईडच्या दिशेने कॉन्ट्रॅक्ट शॉट खेळला. गोळीच्या वेगाने विराट कोहली मार्गात आला तेव्हा चेंडू सीमा रेषा ओलांडणार होता. पण विराटने आपल्या उत्कृष्ठ फील्डींगने चेंडू अडवला. 

हैराण झाला फलंदाज 

विराटने हवेत उडून चेंडू थांबवला आणि डोळ्याच्या झटक्यात चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला. विराट कोहली हे कसे करू शकतो यावर ख्रिस मॉरिसचा विश्वास बसत नव्हता. ख्रिस मॉरिसच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्टपणे दिसत होते. कोहलीने त्याचा शानदार शॉट कसा रोखला हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, त्याला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक का मानले जाते.

बंगलोरची राजस्थानवर मात

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या IPL 2021 च्या 43 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव केला. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलच्या (नाबाद 50) शानदार खेळीच्या मागे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 9 बाद 149 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी संघाने मॅक्सवेलच्या 30 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 50 धावांसह 17.1 षटकांत तीन बाद 153 धावा करून सामना जिंकला.