दुबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काढता पाय घेतला. परंतु तो आयपीएलमध्ये अजूनही CSK च्या कर्णधारपदावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके यावर्षी 9 व्या वेळी आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यासह, धोनीच्या नावावर असा एक विक्रम झाला आहे, की यासंबंधीत मोठ मोठे क्रिकटर देखल पोहण्याचा विचार करु शकत नाहीत.
सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज टी 20 क्रिकेटमधील आपले तिसरे शतक पूर्ण करेल. वास्तविक, टी -20 सामन्यांमध्ये कर्णधार असताना धोनीचा हा एकूण 300 वा सामना असेल. जगातील कोणताही कर्णधार आजपर्यंत इतके सामने खेळलेला नाही.
या प्रकरणात वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 208 टी -20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. धोनी आणि सॅमी मधील फरक पाहिला तर जवळपास ते जवळ-जवळ100 सामने आहेत.
जर आपण याबाबतीत भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर तो यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने एकूण 185 सामन्यांमध्ये RCB आणि भारताचे नेतृत्व केले आहे. परंतु आता तो कर्णधार पद सोडणार असल्यामुळे तो आता धोनीपर्यंत पोहोचू शकणार नाही. एलीमिनेटरमध्ये पराभूत झाल्यानंतर विराटचा संघ आरसीबी आधीच बाहेर पडला आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने यावेळेस 9 वे आयपीएल फायनल गाठले आहे. हे सुद्धा एक रेकॉर्ड आहे. याशिवाय सीएसकेने तीन वेळा आयपीएल ट्रॉफीही जिंकली आहे. CSK ने प्रथम 2010, 2011 आणि नंतर 2018 मध्ये IPL चे विजेतेपद पटकावले. याशिवाय, 2020 वगळता, हा संघ प्रत्येक वेळी प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानेही मोठी कामगिरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम 2007 टी -20 विश्वचषक आणि नंतर 2011 मध्ये 50 ओव्हरचा विश्वचषक जिंकला. एवढेच नाही तर टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही पटकावले आहे. धोनीने पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये भारताला पहिल्या क्रमांकाचा संघ बनवले आहे.