दुबई: पाच वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे करणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माच्या टीमला IPL च्या 14 व्या हंगामात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आलं आहे. प्ले ऑफच्या स्पर्धेतून मुंबई संघ बाहेर गेल्याने मुंबई संघाच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. हिटमॅन रोहित शर्माने टॉस जिंकला तर इशान किशनने सुरुवात चांगली केली. धावांचा डोंगर उभा केला खरा मात्र अखेर निराशाच झाली.
पहिल्या चार फलंदाजांनंतर मात्र पटापट विकेट्स पडू लागल्या. मुंबई संघाने हैदराबाद संघासमोर 236 धावांचं आव्हान ठेवलं. तर मुंबई संघाला प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी टॉस जिंकणं आणि त्याच सोबत 171 धावांनी जिंकणं आवश्यक होतं. रन रेट भरून काढण्यासाठी मुंबई संघाकडे ती एकमेव संधी होती. मात्र हैदराबाद संघाने मुंबईच्या मनसुब्यांना सुरूंग लावाला.
11 ओव्हर 4 बॉलमध्ये हैदराबाद संघाने 4 गडी गमावून 126 धावा केल्या. 2018 नंतर पहिल्यांदाच असं झालं की मुंबई इंडियन्स संघ प्ले ऑफमधून बाहेर राहिला आहे. त्यामुळे हिटमॅन रोहितच्या टीममध्ये कोणत्या गोष्टी कमी पडल्या याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. इशान किशनने 84 धावांची खेळी केली. त्याचं कौतुक देखील होत आहे.
IPL 2021: प्ले ऑफआधी कोलकाता संघासाठी मोठी खुशखबर
कोलकाता संघ 86 धावांनी राजस्थान विरुद्ध सामना जिंकल्याने नेट रनरेट चांगलाच वाढला. पहिल्या टप्प्यात तळाला असलेल्या कोलकाता संघाने दुसऱ्या टप्प्यात मुसंडी मारत प्ले ऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. तर मुंबई संघ दुसऱ्या टप्प्यात कुठेतरी कमी पडल्याचं पाहायला मिळालं. आता कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि दिल्ली कोणाविरुद्ध कोण सामने खेळणार हे लवकरच जाहीर करण्यात येईल.
IPL 2021: संतापलेल्या कॅप्टन धोनीकडून मैदानात अपशब्द? पाहा व्हिडीओ
2013, 2015, 2017, 2019, 2020 पाच वेळा मुंबई संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली आहे. चेन्नई आणि बंगळुरू संघ सुरुवातीपासून फॉर्ममध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावेळी चेन्नई जिंकणार की बंगळुरू याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.