IPL 2021 CSK vs RR: शेवटच्या बॉलवर ठोकला SIX, ऋतुराज गायकवाडचं IPL मध्ये पहिलं शतक

ऋतुराजचं टी -20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. IPLमध्ये त्याने 3 अर्धशतक खेळी आहे.

Updated: Oct 2, 2021, 10:21 PM IST
IPL 2021 CSK vs RR: शेवटच्या बॉलवर ठोकला SIX, ऋतुराज गायकवाडचं IPL मध्ये पहिलं शतक title=

IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान सामना सुरू आहे. या सामन्यात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने आपलं शानदार प्रदर्शन करत राजस्थान संघासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा 24 वर्षीय युवा फलंदाजाने आपल्या आयपीएलच्या करियरमध्ये पहिलं शतक ठोकलं आहे. CSK सोबत खेळताना 24 वर्षीय युवा फलंदाजाने शनिवारी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध नाबाद 101 धावा केल्या. 

ऋतुराजचं टी -20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. IPLमध्ये त्याने 3 अर्धशतक खेळी आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने 3 आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत एक अर्धशतक झळकावले आहे. सध्याच्या हंगामात 500 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने 508 धावा केल्या आहेत. कोहली आणि रोहितने आतापर्यंत 400 धावांचा टप्पा पार करू शकले नाहीत. रोहितने 341 आणि कोहलीने 332 धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपरकिंग्स संघाने 4 गडी गमावून 189 धावा केल्या आहेत. तर राजस्थान संघासाठी 190 धावांचं आव्हान ठेवलं आहे. महेंद्रसिंह धोनीची टीम 16 पॉईंट्सपेक्षा जास्त मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे. तर त्यापाठोपाठ 

चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग-XI) : ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर-कर्णधार), रवींद्र जडेजा, सॅम करेन, शार्दुल ठाकूर, केएम आसिफ आणि जोश हेजलवुड.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग-XI): यशस्वी जायसवाल, एविन लुईस, संजू सॅमसन (कर्णधार), शिवम दुबे, ग्लेन फिलिप, डेविड मिलर, मुस्ताफिजुर रहमान, चेतन सकारिया, राहुल तेवतिया, आकाश सिंह आणि मयंक मार्कंडेय.