IPL 2021 | पृथ्वी आणि पंतची अर्धशतकी खेळी, दिल्लीकडून चेन्नईला विजयासाठी 173 धावांचे आव्हान

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले आहे.  

Updated: Oct 10, 2021, 09:21 PM IST
IPL 2021 | पृथ्वी आणि पंतची अर्धशतकी खेळी, दिल्लीकडून चेन्नईला विजयासाठी 173 धावांचे आव्हान  title=

यूएई : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले  आहे. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 172 धावा केल्या आहेत. दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) सर्वाधिक 60 धावांची स्फोटक खेळी केली. तर कर्णधार रिषभ पंतने (Rishbh Pant) आणि शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) या दोघांनीही चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. (IPL 2021 Qualifier 1 dc vs csk delhi capitals set 173 runs target for chennai super kings)

रिषभने 51 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.  तर शिमरॉनने 37 धावा केल्या. चेन्नईकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जाडेजा, मोईन अली आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 
  
दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू

दिल्ली कॅपिट्ल्स :  शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार),  टॉम करन, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, खगिसो रबाडा, आवेश खान आणि एनरिच नॉर्तजे.  

चेन्नई :  ऋतुराज गायकवाड, फॅफ डु प्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि जोश हेझलवूड