मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मुंबई इंडियन्स संघ आज चेन्नईचं आव्हान कसं पेलणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामने पराभव तर 3 सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. दुसरीकडे चेन्नई संघाने 6 पैकी केवळ 1 सामना गमवला आहे तर 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
काय सांगतात हेड टू हेड सामने?
दोन्ही संघ आतापर्यंत 30 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. एकमेकांविरुद्ध 30 वेळा खेळल्यानंतर त्यापैकी 18 सामने मुंबई संघ जिंकला आहे. तर 12 सामने चेन्नई सुपरकिंग्स संघ जिंकला आहे. जडेजाचा जलवा आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Match Day is upon us!
Set your Whistle alarms for
#MIvCSK #WhistleFromHome #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/c4QY8UOoL6— Chennai Super Kings - Mask Pdu Whistle Pdu! (@ChennaiIPL) May 1, 2021
Gearing up and aligned for the intense fight tonight!
Shardul talks about how the Super team stays together, no matter what.#MIvCSK #WhistlePodu #Yellove @PhonePe_ pic.twitter.com/JpvLT7GaTY— Chennai Super Kings - Mask Pdu Whistle Pdu! (@ChennaiIPL) May 1, 2021
फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि लुंगी नगिदी/ इमरान ताहीर
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जयंत यादव, नाथन कूल्टर नाइल, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट