IPL 2021 MI vs RR | मुंबई विरुद्ध राजस्थान आमनेसामने, दोघांसाठी 'करो या मरो', हिटमॅन 'पलटण'ला तारणार?

 आयपीएलच्या 14 व्या हंगामातील (IPL 2021) 51 वा सामना मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

Updated: Oct 5, 2021, 04:15 PM IST
IPL 2021  MI vs RR | मुंबई विरुद्ध राजस्थान आमनेसामने, दोघांसाठी 'करो या मरो', हिटमॅन 'पलटण'ला तारणार? title=

यूएई : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील (IPL 2021) 51 वा सामन्याला आज (5 ऑक्टोबर) शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians?) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthn Royals) आमनेसामने असणार आहेत. (IPL 2021 Match 51 Mumbai Indians vs Rajasthan Royals Both teams need to win the match for playoffs See head to head records of both teams)

प्लेऑफमधील (Playoff) जर तरचं आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघात चढाओढ पाहायला मिळणार आहे. 

अशी आहे दोन्ही संघांची आकडेवारी

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. मुंबईने यापैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 11 वेळा बाजी मारली आहे. राजस्थानने या 14 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यातील सामन्यात मुंबईचा 7 विकेट्सने पराभूत केलं होतं. ताज्या आकडेवारीनुसार राजस्थान आणि मुंबईने अनुक्रमे 6 व्या आणि 7 व्या क्रमांकावर आहेत. 

मुंबईची निराशाजनक कामगिरी

मुंबई आयपीएलमधील यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. यापैकी 2019 आणि 2020 या  2 वर्षात सलग विजेतेपद पटकावलं. त्यामुळे मुंबई या 14 व्या हंगामात विजेतेपदाची हॅट्रिक पूर्ण करण्याच्या इराद्याने मैदानात उतरली होती. मात्र यावेळेस मुंबईला नेहमीप्रमाणे चमकदार कामगिरी करता आली नाही. 

मुंबईचे स्टार खेळाडू हे अपयशी ठरतायेत. त्यात आता प्लेऑफमधील समीकरण जर तर वर आधारित आहे. मुंबईला राजस्थानचा सामना करावा लागणार आहे. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हे धमाकेदार खेळी करतायेत. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांसमोर या दोघांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.

दोन्ही संघासाठी प्लेऑफचं समीकरण

मुंबई आणि राजस्थान या दोन्ही टीमचे या मोसमातील प्रत्येकी 2 साखळी सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही टीमना हे सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. राजस्थानचा नेट रन रेट हा -0.337 इतका आहे. तर मुंबईचा नेट रन रेट हा  -0.453 असा आहे.  

या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचं या 14 व्या मोसमातील आव्हान संपुष्टात येईल. मात्र प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केल्यानंतरही विजय टीमचं आव्हान सोपं असणार नाही. कारण कोलकाताने पुढील सामन्यात विजय मिळवला, तर त्यांचे 14 पॉइंट्स होतील. तसंच त्यांचा नेट रन रेटही वधारेल. त्यामुळे या आजच्या सामन्यात दोन्ही संघ ताकदीने उतरतील.

मुंबईच्या फलंदाजांवर या सामन्यात चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी असणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक आणि कायरन पोलार्ड यांना त्यांच्या लौकीकाला साजेशी खेळी करावी लागणार आहे. या सामन्यात मुंबईची पलटण बाजी मारणार, की राजस्थान हल्ला बोल करणार, याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे.

असे आहेत दोन्ही संघ

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, इयन लुईस, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, ओशाने थॉमस, मुस्ताफिजुर रहमान, तबरेज शम्सी, ग्लेन फिलिप्स, चेतन सकारिया, रियान पराग, राहुल तेवतिया, आकाश सिंह, अनुज रावत, केसी करियप्पा, यशस्वी जयसवाल, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मयंक मार्कंडे, जयदेव उनादकट आणि महिपाल लोमरोर.

मुंबई इंडियंस: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस  लिन, सौरभ तिवारी, अनुकूल रॉय, सिमरजीत सिंह, हार्दिक पंड्या, क्रृणाल पंड्या, जेम्स नीशाम, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, मार्को जानसेन, युद्धवीर सिंह, एडम मिल्ने, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मोहसिन खान, नाथन कूल्टर नाईल, पीयूष चावला, राहुल चहर आणि ट्रेंट बोल्ट.