IPL 2021: 'माझ्या गर्भवती पार्टनरला तरी सोडा', RCB च्या खेळाडूचं ट्रोलर्सना आवाहन

माझ्या गर्भवती पत्नीला तरी सोडा असं म्हणायची वेळ या RCB च्या खेळाडूवर का आली... का केलं जातंय ट्रोल

Updated: Oct 13, 2021, 04:50 PM IST
IPL 2021: 'माझ्या गर्भवती पार्टनरला तरी सोडा', RCB च्या खेळाडूचं ट्रोलर्सना आवाहन title=

मुंबई: कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात RCB संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या संघाकडून चाहत्यांच्याही अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र क्वालीफायर सामन्यात RCB टीमचा कोलकाता संघाने पराभव केल्यानं चाहत्यांची निराशा झाले. RCB चं कर्णधारपद विराट कोहली सोडणार असल्याने त्यांना सोशल मीडियावर सहानुभूतीही मिळाली. मात्र RCB ला तेवढंच ट्रोल करण्यात आलं. या संघातील एका ऑलराऊंडर खेळाडूनं ट्रोलर्सना आवाहन केलं आहे.

RCB चा ऑलाराऊंडर खेळाडू डॅनियल क्रिश्चियनने ट्रोलर्सला आवाहन केलं आहे. 2021 च्या IPLच्या एलिमिनेटरमध्ये कोलकाता संघाने बंगळुरूचा 4 विकेट्सने पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर RCBच्या खेळाडूंना अनेकांनी ट्रोल केलं. क्रिश्चियनसाठी बॅटिंग आणि बॉलिंगसाठी दोन्हीसाठी हा सामना कठीण आणि अडचणीचा ठरला. 8 बॉलमध्ये त्याला केवळ 9 धावा करण्यात यश आलं आहे. इतकच नाही तर बॉलिंगमध्ये देखील त्याची कामगिरी विशेष राहिली नाही.

RCB पराभूत झाल्यानंतर डॅनियल क्रिश्चियनलाच नाही तर त्याच्या पार्टनरलाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. त्यावरून त्याने आपल्या गर्भवती पार्टनरला तरी ट्रोल करू नये असं आवाहन ट्रोलर्सना केलं. या प्रकरणी  डॅनियल क्रिश्चियनला इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून मेसेज लिहावा लागला. त्याने ट्रोलर्सना आवाहन केलं आहे की आपल्या गर्भवती पार्टनरला या सगळ्यापासून दूर ठेवावं.

IPL 2021 चा क्वालीफायरचा सामना काही विशेष खास राहिला नाही. हा खेळ आहे त्यामुळे हार आणि जित होत राहणार. आजचा सामना चांगला झाला नाही. मात्र तो खेळाचा एक भाग आहे. कृपया माझ्या गर्भवती पार्टनरला या सगळ्यापासून दूर ठेवा असं आवाहन डॅनियलने ट्रोलर्सना केलं आहे.