मुंबई : विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मंगळवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने दहा धावांनी पराभव करून थरारक विजय नोंदविला. मुंबई इंडियन्सचा डाव 152 धावांवर आटोपल्यानंतर कोलकाता संघाकडून ओपनींगसाठी नितीश राणा आणि शुभमन गिल 72 धावांच्या भागीदारीमुळे विजयाच्या जवळ पोहोचले. यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कोलकाताला 10 धावांसाठी रोखले आणि आपल्या नावावर विजय नोंदवला.
कोलकाता नाईट रायडर्सच्या या पराभवानंतर संघाचा मालक शाहरुख खानने ट्विटरवरुन आपला रोश दाखवला. कोलकाता नाइट रायडर्सच्या या खराब कामगिरीनंतर शाहरुख खानने ट्विटरवर चाहत्यांची माफी मागितली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या या पराभवानंतर शाहरुख खानने ट्विटरवर लिहिले की, "निराशाजनक कामगिरी, केकेआर चाहत्यांसाठी मी फक्त एकच गोष्ट बोलू शकतो ते म्हणजे, क्षमा करा."
सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 15 धावांची आवश्यकता होती. ट्रेंट बोल्टने या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. त्याने आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्सला आपला बळी बनवले. दिनेश कार्तिकसारख्या अनुभवी फलंदाजांलाही शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या संघाला जिंकवला आले नाही.
शेवटच्या पाच ओव्हरमध्ये सहा विकेट्स शिल्लक असताना केकेआरला 31 धावांची गरज होती, परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांच्या जबड्यातून मॅचला काढली. राहुलने चार ओव्हरमध्ये 27 धावा देऊन चार गडी बाद केले तर, चार ओव्हरमध्ये केवळ 13 धावा देऊन क्रृणालने एक विकेट घेतली. ट्रेंट बोल्टनेही शेवटच्या ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी केली आणि दोन गडी बाद केले.