IPL 2020: हैदराबादचा पंजाबवर 69 रनने विजय

पंजाबची संपूर्ण टीम ऑलआऊट

Updated: Oct 9, 2020, 12:01 AM IST
IPL 2020: हैदराबादचा पंजाबवर 69 रनने विजय title=

मुंबई : आयपीएल सीजन 13 च्या 22 व्या सामन्यात हैदराबादने पंजाबला 69 रनने पराभव केला आहे. टॉस जिंकल्यानंतर आधी बॅटींग करण्याचा निर्णय हैदराबादसाठी योग्य ठरला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमवत 201 रन केले. 202 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबच्या टीमने 16.5 ओव्हरध्ये 132 रन केले. पंजाबची संपूर्ण टीम ऑलआऊट झाली. पंजाबकडून निकोलस पूरनने 77 रनची शानदार खेळी केली. दुसरा कोणताच बॅट्समन टिकू शकला नाही.

सनरायजर्स हैदराबादकडून जॉनी बेयरस्टोने 97 रनची तुफानी खेळी केली. डेविड वॉर्नरने आज 52 रन केले. वॉर्नर आणि बेयरस्टोने पहिल्या विकेटसाठी आज 160 रनची पार्टनरशिप केली. केन विलियमसनने 20 रन केले.

जॉनी बेयरस्टोने 10 व्या ओव्हरमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर वॉर्नरने 14व्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अब्दुल समद (8), मनीष पांडे (1) आणि प्रियम गर्ग (0) वर आऊट झाले. अभिषेक शर्माने 12 रन केले.

किंग्स इलेवन पंजाबकडून लेग स्पिनर रवी बिश्नोईने 29 रन देत 3 विकेट घेतले. अर्शदीप सिंहने 33 रन देत 2 विकेट घेतले.