दुबई : शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबईने 16.5 ओव्हरमध्ये 149/2 धावा करत विजय मिळविला. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 148 धावा करुन मुंबईसमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवले. विकेटकीपर फलंदाज क्विंटन डिकॉकने मुंबईच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आणि नाबाद 78 धावा फटकावल्या.
जसप्रीत बुमराहचा हॉट बाउन्सर या सामन्यात पाहायला मिळाला. दहाव्या ओव्हरमध्ये रसेलने बुमराहच्या बॉलवर फोर मारला. एका चेंडूनंतर बुमराहने रसेलला भारतीय वेगवान बॉलर कसा असतो याची जाणीव करून दिली. पुढे बुमराहच्या बॉलवर रसेलने जागा बनवण्याचा प्रयत्न केला, पण बुमराहने बरोबर बॉल टाकला आणि रसेल आऊट झाला.
— shailesh Musale (@shailesh_musale) October 17, 2020
आयपीएल 2020 दरम्यान बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सने 8 विकेट राखून पराभव केला. केकेआरचा मागील दोन सामन्यात सलग दुसरा पराभव आहे. तसेच या मोसमात मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.