IPL 2020: दिल्ली आणि बंगळुरु मध्ये नंबर 2 साठी कांटे की टक्कर

दिल्ली आणि बंगळुरु मध्ये आज रंगणार सामना

Updated: Nov 2, 2020, 03:51 PM IST
IPL 2020: दिल्ली आणि बंगळुरु मध्ये नंबर 2 साठी कांटे की टक्कर title=

अबुधाबी : आज आयपीएल लीगमधील 55 वा सामना दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना दोघांसाठी खूप महत्वाचा आहे. आज अबुधाबी येथे होणाऱ्या या सामन्यात विजयी संघ प्ले ऑफमध्ये आपली जागा पक्की करणार आहे.

अप्रत्यक्षपणे, दोन्ही संघांमधील हा सामना एक प्रकारचा उपांत्यपूर्व सामना असेल, आज विजयी होणारा संघ क्वालिफायर -1 मध्ये पोहोचेल. ज्यामुळे त्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोचण्याच्या दोन संधी असतील. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.

मागील काही सामने इथल्या दोन्ही संघांसाठी अतिशय निराशाजनक राहिले. मागील चारही सामने दिल्लीने गमावले असताना बंगळुरूलाही सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला. स्टार खेळाडूंनी परिपूर्ण असे दोन्ही संघ आज पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी प्रयत्न करतील.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने पहिल्या टप्प्यात बहुतेक संघांना पराभूत केले. त्यानंतर संघाची कामगिरी थोडी खराब राहिली. जेव्हा फलंदाजांची कामगिरी ढासळली तेव्हा गोलंदाजही संघर्ष करताना दिसून आले. संघाच्या सलामीच्या जोडीलाही काही सामने वगळता चांगली सुरुवात मिळू शकली नाही. धवनच्या सलग दोन शतकानंतर फलंदाजीही शांत झाली, तर पंतला या हंगामात एकही अर्धशतक करता आले नाही. हे सर्व पाहता, आज या संघाला या स्टार खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा असतील.

पहिल्या टप्प्यात शानदार प्रदर्शन करून बंगळुरू संघानेही शेवटच्या काही सामन्यांमध्ये संघर्ष केला. विराटच्या आरसीबीने शेवटचे तीन सामने गमावले आहेत. यानंतर पुन्हा एकदा विराट आणि डिव्हिलियर्सवर संघाची जबाबदारी असेल. संघाचा सलामीवीर अॅरोन फिंचला काही खास कामगिरी करता आलेली नाही, तर देवदत्त पाडिक्कल चांगल्या फॉर्मात असून विराट आणि डिव्हिलियर्सप्रमाणेच शेवटच्या काही सामन्यांत तो अपयशी ठरला आहे. ख्रिस मॉरिस आणि नवदीप सैनी यांची ही कामगिरी प्रभावी राहिलेली नाही.