दुबई : आयपीएल -13 मधील 49 सामन्यांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने ऑरेंज कॅप आपल्याकडेच कायम ठेवली आहे आणि दिल्ली कॅपिटलचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने पर्पल कॅप कायम ठेवली आहे.
फलंदाजी करताना राहुलने 12 सामन्यांत 595 धावा केल्या आहेत. दुसर्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटलचा शिखर धवन असून त्याने 12 सामन्यांत 471 धावा केल्या आहेत. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 12 सामन्यांत 436 रनसह तिसर्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजांच्या यादीत रबाडा पहिल्या स्थानावर आहे. रबाडाने आतापर्यंत 12 सामन्यांत 23 विकेट घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने 12 सामन्यांत 20 विकेट घेतले असून तो दुसर्या स्थानावर आहे, तर किंग्ज इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 12 सामन्यांत 20 विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये पात्र ठरणारा या मोसमातील पहिला संघ ठरला आहे. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला, ज्यामुळे मुंबईने प्लेऑफसाठी क्वालिफाय केले.
मुंबईचे आता 16 गुण झाले असून लीगमध्ये अजून दोन सामने शिल्लक आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसर्या तर दिल्ली कॅपिटलचा संघ तिसर्या क्रमांकावर आहे.