अबुधाबी : मयंक अग्रवालने आपल्याच संघाचा कर्णधार केएल राहुलला मागे टाकत ऑरेंज कॅप मिळवली आहे. तर पर्पल कॅप मोहम्मद शमीकडे कायम आहे. मयंक आणि शमीचा संघ किंग्ज इलेव्हन पंजाबला गुरुवारी मुंबई इंडियन्सकडून 48 धावांनी पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात मयंकने 25 धावा केल्या आणि यासह मयंकचे चार सामन्यांमध्ये 246 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो आता पहिल्या स्थानावर आहे. मुंबई विरुद्ध राहुलला फक्त 17 धावा करता आल्या. त्याच्या एकूण 239 धावा झाल्या आहेत.
This #WorldSmileDay, we give you a reason to #SaddaPunjab #IPL2020 #KXIP @mayankcricket pic.twitter.com/sNUxCfFpMD
— Kings XI Punjab (@lionsdenkxip) October 2, 2020
गोलंदाजीत शमीने 4 सामन्यात 8 विकेट घेतले आहेत. त्याच्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटलच्या कॅगिसो रबाडाचा क्रमांक लागतो. रबाडाने 3 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. तिसर्या क्रमांकावर राहुल चहर असून त्याने 4 सामन्यांत 6 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप ही सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला दिली जाते आणि पर्पल कॅप ही सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला दिली जाते.