IPL 2020: PPE किट घालून दुबईला पोहोचले इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर्स

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू दुबई विमानतळावर उतरल्यानंतर सर्व संघांनी सुटकेचा श्वास घेतला. 

Updated: Sep 18, 2020, 06:41 PM IST
IPL 2020: PPE किट घालून दुबईला पोहोचले इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर्स title=

दुबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होण्याच्या एक दिवस आधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पीपीई किट परिधान करून दुबई विमानतळावर उतरल्यानंतर सर्व संघांनी सुटकेचा श्वास घेतला. याआधी या क्रिकेटर्सच्या आगमनाबद्दल शंका होती. सुरुवातीच्या सामन्यात हे क्रिकेटपटू खेळणार की नाही याबाबत शंका होती. लीगमधील 14 सामने खेळल्यानंतर चित्र स्पष्ट होतं. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो.

पीपीई किटमुळे ओळखणे कठीण

इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सीरीज संपल्यानंतर या खेळाडूंना 'बायो सिक्योर बबल'मधून सर्व क्रिकेटपटूंना थेट दुबईला आणण्यात आले आहे. वाटेत कोणत्याही कारणास्तव कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व क्रिकेटपटूंनी पीपीई किट घातले होते. पण पीपीई किटमुळे खेळाडूंची ओळख पटविणेही कठीण होते. यामुळे गुरुवारी रात्री क्रिकेटपटू जेव्हा आले तेव्हा राजस्थान रॉयल्स संघाने एक प्रश्न विचारला, 'चार नवीन पाहुणे. आपण खेळाडू ओळखू शकता?. या क्रिकेटर्सचे आगमनामुळे राजस्थान संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer), अष्टपैलू टॉम कुरैन (Tom Curran) आणि एंड्रयू टाई (Andrew Tye) हे चार खेळाडू दुबईत दाखल झाले.

सनरायझर्स आणि केकेआर संघाला दिलासा

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्ससुद्धा पीपीई किट परिधान केल्यामुळे ओळखले जात नव्हते. क्रिकेटर्सच्या आगमनानंतर दोन्ही संघांना मोठा दिलासा मिळाला आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे एकूण 21 क्रिकेटपटू दुबई येथे विशेष चार्टर्ड विमानाने दाखल झाले. विमानतळवर या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली. या सर्व खेळाडूंना हॉटेलच्या खोलीत 6 दिवस ऐवजी 36 तासांसाठी क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. मॅनेजमेंटने विनंती केल्यानंतर दुबई प्रशासनाने याला परवानगी दिली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या क्रिकेटपटूंना हा दिलासा मिळणार नाही, कारण अबुधाबीच्या सरकारने क्वारंटाइन कालावधी कमी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे लीगचे सहा संघ अबुधाबीऐवजी दुबईमध्ये थांबले आहेत. अबूधाबीमध्ये फक्त मुंबई इंडियन्स आणि केकेआरचा कॅम्प आहे.