video : रहाणेची खेळी पाहून लेकीचा आनंद गगनात मावेना

अजिंक्य राहणेच्या मुलीचा हा व्हिडिओ पाहिला का?   

Updated: Nov 4, 2020, 09:47 PM IST
video : रहाणेची खेळी पाहून लेकीचा आनंद गगनात मावेना  title=

मुंबई : अबू धाबी येथील शेख झैद स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या IPL 2020 च्या दिल्ली विरुद्ध बंगळुरू या संघांतील सामन्यामध्ये अजिंक्य रहाणेच्या खेळीनं महत्त्वाचं योगदान दिलं. ज्याच्या बळावर दिल्लीच्या संघानं बंगळुरूवर मात केली. परिणामी दिल्लीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला. 

दिल्लीच्या संघाला पाठिंबा देणाऱ्या क्रीडारसिंकासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण. पण, त्यासोबतच या संघाची सरवात लहान चाहती असणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या मुलीला झालेला आनंद काही औरच होता. 
आपल्या वडिलांची ही खेळी पाहून आर्याला नेमका किती आनंद झाला हे सोशल मीडियावरील एक व्हिडिओ पाहून लगेचच लक्षात येत आहे. ज्यामध्ये आर्या अतिशय उत्साहात टाळ्या वाजवताना दिसत आहे. सध्या अनेक खेळाडूंची कुटुंबही दुबईला आहेत, त्याचप्रमाणं अजिंक्यची पत्नी आणि मुलगीसुद्धा तिथं पोहोचले आहेत. 

अजिक्यं स्टेडियममध्ये खेळण्यासाठी उतरला असता या दोघीजणी हा सामना टीव्हीवर पाहत होत्या. त्याचवेळी अजिंक्यनं अर्धशतक झळकावताच आर्याला इतका आनंद झाला की तो केवळ शब्दांत व्यक्त करणंही अशक्यच. 
रहाणेनं या सामन्यात ४६ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्यानं पाच चौकार आणि एक षटकार लगावला होता.