पुढच्या वर्षी भारताबाहेर होणार आयपीएलचे सामने

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी बॅडन्यूज

Updated: Sep 11, 2018, 11:29 AM IST
पुढच्या वर्षी भारताबाहेर होणार आयपीएलचे सामने title=

मुंबई : भारतातील क्रिकेटचा उत्सव मानल्या जाणाऱ्या आयपीएलचे सामने पुढच्या वर्षी भारताच्या बाहेर होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये भारतात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होतात याकडे बीसीसीआयचं लक्ष लागून आहे. कारण त्यावरच 2019 च्या आयपीएलचं आयोजन केलं जाणार आहे.

याआधी 2009 आणि 2014 मध्येही भारताबाहेर आयपीएलचे सामने झाले आहेत. 2009 मध्ये दक्षिण आफ्रिका तर 2014 मध्ये युएईमध्ये आयपीएलचे सामने झाले होते. त्यामुळे 2019 मध्ये देखील आयपीएल भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. याच 2 देशांमध्ये किंवा 2 वेगवेगळ्या देशांमध्ये हे सामने होऊ खेळवले जावू शकता. इंग्लंडची ही चर्चा यामध्ये होत आहे.

इंग्लंडमध्ये सामने ठेवल्यास ते अधिक खर्चीक होऊ शकतात. युएईमध्ये तीनच मैदानं असल्याने अधिक कल हा आफ्रिकेच्या बाजुने आहे. लवकरच यावर बीसीसीआयची बैठक होणार आहे. 

दुसरीकडे पुढच्यावर्षी वर्ल्डकप देखील आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. नियमित वेळेच्या आधी सामने होऊ शकतात. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून आयपीएल सुरु करण्यावर चर्चा सुरु आहे.