IPL 2019: मुंबईची मोठी धावसंख्या, बंगळुरूला विजयासाठी १८८ रनची गरज

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Updated: Mar 28, 2019, 10:02 PM IST
IPL 2019: मुंबईची मोठी धावसंख्या, बंगळुरूला विजयासाठी १८८ रनची गरज title=

बंगळुरू : बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने मोठी धावसंख्या उभारली आहे. टॉस जिंकून बंगळुरूने मुंबईला सुरुवातीला बॅटिंगला पाठवलं. यानंतर मुंबईने २० ओव्हरमध्ये १८७/८ एवढा स्कोअर केला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (४८ रन) आणि क्विंटन डिकॉकने (२३रन) मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. ५४ रनवर मुंबईची पहिली विकेट पडली. पण यानंतर मुंबईची पडझड व्हायला सुरुवात झाली. मागच्या मॅचमध्ये अर्धशतक करणाऱ्या युवराज सिंगने चहलच्या एका ओव्हरच्या पहिल्या तीन बॉलला सिक्स मारली. चौथ्या बॉलला सिक्स मारायच्या प्रयत्नामध्ये युवराज २३ रनवर आऊट झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवने २४ बॉलमध्ये ३८ रनची खेळी केली.

मुंबईची टीम मोठी धावसंख्या उभारणार नाही असं वाटत असतानाच हार्दिक पांड्याने शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी केली. हार्दिक पांड्याने १४ बॉलमध्ये नाबाद ३२ रन केले.

बंगळुरूकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर उमेश यादव आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं.

यंदाच्या आयपीएलमधली मुंबई आणि बंगळुरूची ही दुसरी मॅच आहे. या दोन्ही टीमनी त्यांच्या पहिल्या मॅच गमावल्या आहेत, त्यामुळे ही मॅच जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये खातं उघडण्याचा दोघांचा प्रयत्न असेल. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा