वजनदार असल्याने 'या' खेळाडूला विराटने केले होते टीम बाहेर

पहिलं स्वत:च वजन कमी कर मग टीममध्ये संधी मिळेल असे कोहलीने सरफराजला सांगितले होते.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 7, 2018, 09:49 AM IST
वजनदार असल्याने 'या' खेळाडूला विराटने केले होते टीम बाहेर title=

मुंबई : आरसीबी ने विराट कोहली, एबी डिविलिअर्स सोबत एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेल्या सरफराज खानला ३ कोटींची बोली लावली.

आरसीबीमध्ये सरफराजची जागा पक्की होण हे अनेकांसाठी हैराण करणारे आहे. पण सरफराज याने खूप आनंदीत आहे.

त्याने कॅप्टन कोहलीला धन्यवाद दिले आहेत. 

वजनदार असल्याने टीम बाहेर

पहिलं स्वत:च वजन कमी कर मग टीममध्ये संधी मिळेल असे कोहलीने सरफराजला सांगितले होते.

विराटच ऐकून सरफराजने एक वर्षात आपल्या फिटनेसमध्ये बदल केला आहे. 

 

Working hard on my rehab. Insha allah i will be back soon stronger and better 

A post shared by SARFARAZ KHAN (@sarfarazkhan97) on

चांगले प्रदर्शन करेन

सरफराज खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'तुमच्या सर्वांचे धन्यवाद. विराट भाईने माझ्यावर विश्वास दाखविला. मला संधी मिळाली तर चांगले प्रदर्शन करेन.' असे यामध्ये म्हटले आहे.