VIDEO: 'गणपती बाप्पा मोरया' गाण्याने झाली IPL 2018ची रंगतदार सुरुवात

आयपीएल ११च्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात झाली. आयपीएलचा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये पार पडला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Apr 7, 2018, 07:43 PM IST
VIDEO: 'गणपती बाप्पा मोरया' गाण्याने झाली IPL 2018ची रंगतदार सुरुवात title=
Image: IANS

मुंबई : आयपीएल ११च्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात झाली. आयपीएलचा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये पार पडला. सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारात उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आणि सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मीकाच्या आयपीएल सॉन्ग 'ये खेल है शेर जवानों का' या गाण्याने उद्घाटन सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

आयपीएलच्या ११व्या मोसमाच्या उद्घाटन सोहळ्यात पहिला परफॉर्मन्स अभिनेता वरुण धवनने केला. वरुण धवनने 'गणपती बाप्पा मोरया' या गाण्यावर आपलं सादरीकरणं केलं. या व्यतिरिक्त वरुण धवनने जुडवा आणि बद्रीनाथ की दुल्हनिया गाण्यावरही परफॉर्मन्स सादर केला.

'गणपती बाप्पा मोरया' या गाण्यावर परफॉर्मन्स केल्यानंतर वरुणने जुडवा-२ सिनेमातील 'टन टना टन टन टन तारा' या गाण्यावर डान्स करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

वरुण धवन नंतर प्रभुदेवा आपला परफॉर्मन्स सादर करण्यासाठी स्टेजवर दाखल झाला. प्रभुदेवाने 'मुकाबला-मुकाबला' गाण्यावर डान्स केला. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेला हा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती.