नागपूर : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूरच्या जामठा स्टेडियमवर श्रीलंका-भारत यांच्यात दुसरी टेस्ट मॅच रंगणार आहे. पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाल्यानंतर आता नागपुरात होणारी मॅच जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेच्या बॉलर्सने टीम इंडियाला २०० रन्सचा पल्लाही गाठू दिला नाही. मात्र, दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन करत आपलं पारडं जड केलं. मात्र, भारतीय टीमला विजय मिळवण्यात अपयश आलं.
के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्यावर रन्स करण्याची मुख्य जबाबदारी असणार आहे. तर, पहिल्या टेस्ट मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आलेल्या टीम इंडियाला नागपूर टेस्टमध्ये आपली गुणवत्ता दाखवायची संधी आहे.
नागपुरमधील टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया रन्सचा डोंगर उभा करुन प्रतिस्पर्धी श्रीलंकन टीमला पराभवाची धूळ चारु शकतं.