कोलकाता : भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून टेस्ट सीरिजला सुरवात होत आहे.
तीन मॅचेसच्या या सीरिजमध्ये विजय मिळवत श्रीलंकेवर विजय मिळवण्याची मालिका सुरुच ठेवण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तर, श्रीलंकन टीम आपला पराभव विसरत सीरिज आपल्या नावावर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर पहिली टेस्ट मॅच थोड्याच वेळात सुरु होणार आहे. मात्र, या सीरिजवर सध्या पावसाचं सावट असल्याचं दिसत आहे.
कोलकातामध्ये बुधवारी पावसाने हजेरी लावली. तसेच, गुरुवारीही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी पडलेल्या पावसामुळे श्रीलंकन टीम प्रॅक्टिस करु शकली नाही.
काही दिवसांपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या तिन्ही फॉरमॅटमध्ये श्रीलंकेचा ९-० ने पराभव केला होता. त्यानंतर श्रीलंकन टीमने युएईमध्ये पाकिस्तानचा २-०ने पराभव केला होता.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय टीम आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. इडन गार्डन्सवर भुवनेश्वर कुमारला मैदानात उतरवलं जाणार आहे.