'माझं शरीर कापून बघा, रक्तच आहे'

विराट कोहलीनं २०१७ मध्ये आत्तापर्यंत ७ टेस्ट, २७ वनडे आणि १० टी-२० खेळल्या.

Updated: Nov 15, 2017, 08:20 PM IST
'माझं शरीर कापून बघा, रक्तच आहे' title=

कोलकाता : विराट कोहलीनं २०१७ मध्ये आत्तापर्यंत ७ टेस्ट, २७ वनडे आणि १० टी-२० खेळल्या. या वर्षात एवढ्या आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा कोहली एकमेव खेळाडू आहे. याचबरोबर आयपीएलमध्येही विराट कोहली खेळला होता. वर्षभरामध्ये एवढं क्रिकेट खेळल्यावर मलाही विश्रांतीची आवश्यकता आहे, असं वक्तव्य विराट कोहलीनं केलं आहे.

जेव्हा मला वाटेल माझ्या शरिराला आरामाची गरज आहे तेव्हा मी सांगेन. मी रोबोट नाही. माझं शरीर कापून बघा, त्यातून रक्तच येईल, असंही कोहली म्हणाला आहे. कोहलीचं हे वक्तव्य म्हणजे आगामी सीरिजमध्ये विश्रांतीचे संकेत तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होतोय.

भारत आणि श्रीलंकेमध्ये ३ टेस्ट, ३ वनडे आणि ३ टी-२०ची सीरिज होणार आहे. यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेसारख्या महत्त्वाच्या दौऱ्यावर विराट कोहलीला विश्रांती देणार का श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२०मध्ये विश्रांती देण्यात येणार पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये वारंवार होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेवरही कोहलीनं भाष्य केलं आहे. याबाबतचा निर्णय प्रेक्षकच घेतील, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली आहे.