INDvsSA: टीम इंडियाच्या विजयाचे ५ शिल्पकार

पहिल्या दोन मॅचमध्ये पराभव स्विकारावा लागलेल्या टीम इंडियाने तिसरी मॅच ६३ रन्सने जिंकली. या विजयात ५ भारतीय प्लेअर्सचा मोठा वाटा आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 27, 2018, 11:15 PM IST
INDvsSA: टीम इंडियाच्या विजयाचे ५ शिल्पकार title=

जोहान्सबर्ग : टीम इंडियाने टेस्ट मॅच जिंकत आपल्या चाहत्यांना दक्षिण आफ्रिकेतून एक आनंदवार्ता दिली. पहिल्या दोन मॅचमध्ये पराभव स्विकारावा लागलेल्या टीम इंडियाने तिसरी मॅच ६३ रन्सने जिंकली. या विजयात ५ भारतीय प्लेअर्सचा मोठा वाटा आहे.

तिसरी टेस्ट मॅच जिंकत टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये आपल्या विजयाची परंपरा कायम राखली आहे. या मैदानात टीम इंडियाला आतापर्यंत एकाही मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला नाहीये. 

अजिंक्य रहाणे : 

जोहान्सबर्गच्या पिचवर बॅटिंग करणं खूपच कठीण होतं. मात्र, रोहित शर्माच्या ऐवजी टीममध्ये आलेल्या अजिंक्य रहाणे याने आपली कामगिरी दाखवली आहे. पहिल्या इनिंगमध्ये अजिंक्यने चांगला स्कोअर केला नाही मात्र, दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने ४८ रन्सची इनिंग खेळली. पिच चांगला नसतानाही अजिंक्यने मोठी इनिंग खेळली.

हे पण पाहा: INDvsSA: ज्या खेळाडूला टीममधून केलं होतं बाहेर तोच बनला मॅचचा हिरो

मोहम्मद शमी :

तिसऱ्या मॅचमध्ये मोहम्मद शमीने एकूण ६ विकेट्स घेतले. यासोबतच दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने २७ रन्सची इनिंगही खेळली.

भुवनेश्वर कुमार :

पहिल्या टेस्ट मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला दुसऱ्या मॅचमध्ये संधी दिली नाही. त्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये पुन्हा भुवनेश्वरला संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. भुवनेश्वरने पहिल्या इनिंगमध्ये ३ विकेट्स घेतले आणि दुसऱ्या इनिंगमध्येही ३ विकेट्स घेतले. तसेच मॅचमधील दोन्ही इनिंग्समध्ये ६३ रन्सही केले.

विराट कोहली :

या सीरिजमध्ये सर्वाधिक रन्स बनवणारा टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनेही चांगलं प्रदर्शन दाखवलं. या सीरिजमध्ये विराटने २८६ रन्स बनवत अव्वलस्थान गाठलं. त्यानंतर डिविलयर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या टेस्ट मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये विराटने ५४ रन्स तर दुसऱ्या इनिंगमध्ये ४१ रन्स केले.

जसप्रीत बुमराह : 

आपली पहिलीच टेस्ट सीरिज खेळत असलेल्या बुमराहने कमाल केली. तिसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने ५ विकेट्स घेतले तर दुसऱ्या इनिंगमध्ये २ विकेट्स घेतले.