हेमिल्टन : न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 8 विकेटने पराभव झाला. हा पराभव झाल्यानंतर देखीलही या सामन्यात कर्णधार मिताली राजने एक विक्रम केला आहे. सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम मिताली राजने केला आहे. न्यूझीलंड विरुद्धचा हा तिसरा सामना मिताली राजचा 200 वा एकदिवसीय सामना ठरला आहे. महिला क्रिकेट विश्वात 200 सामने खेळण्याचा विक्रम मितालीने आपल्यान नावे केला आहे.
Congratulations on No.200 Skipper - @M_Raj03 #TeamIndia pic.twitter.com/oxCWRp4qGO
— BCCI Women (@BCCIWomen) February 1, 2019
Congratulations to India Women captain @M_Raj03, who has now become the first woman to play 200 ODIs. #NZvIND pic.twitter.com/mNXFz5C1xm
— ICC (@ICC) February 1, 2019
मिताली राजने 1999 साली एकदिवसीय क्रिकेट मध्ये आयर्लंड विरुद्ध पदार्पण केले होते. आतापर्यंत खेळलेल्या 200 एकदिवसीय सामन्यात मितालीने 6622 धावा केल्या आहेत. यात 123 ही मितालीची सर्वोत्तम खेळी आहे. मितालीने एकदिवसीय कारकीर्दीत 7 शतकं तर 52 अर्धशतकं केली आहेत. गत वर्षात मितालीने इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड्सच्या 191 एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम मोडीत काढला होता. याच विक्रमासोबत महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमदेखील मितालीच्या नावे आहे. तिने 200 सामन्यात 6622 धावा केल्या आहेत.
It's a special game for captain @M_Raj03 as she becomes the first woman to play 200 ODIs. Stay tuned for 2nd innings. New Zealand need 150 to win. #NZvINDhttps://t.co/0pWWx7ZWRr pic.twitter.com/xJZFPAduyJ
— BCCI Women (@BCCIWomen) February 1, 2019
विशेष बाब अशी की, महिला आणि पुरुष क्रिकेट विश्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारताच्या नावे आहेत. भारतीय पुरुष संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने 463 सामन्यात 18 हजार 426 धावा केल्या आहेत. तर महिला क्रिकेटमध्ये मिताली राजने 200 एकदिवसीय सामन्यात 6622 धावा केल्या आहेत.
मिताली राजकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. भारतीय संघासाठी मिताली राजने आातापर्यंत 123 सामन्यात कर्णधाराची भूमिका बजावली आहे.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा तिसरा सामना हेमिल्टन येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 विकेटने पराभव केला. या मालिकेच्या तिसऱ्या आणि वैयक्तिक 200 व्या सामन्यात मिताली राजला विशेष कामगिरी करता आली नाही. मिताली राजने 9 धावा केल्या.
न्यूझीलंडच्या या विजयामुळे तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-1 च्या फरकाने जिंकली. भारताने एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंविरुद्धात तीन टी-20 सामने खेळणार आहे. टी-20 मालिकेला 6 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे.