INDvsAUS: विराटच्या झुंजार शतकामुळे भारताचा डाव सावरला

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला आहे. 

Updated: Mar 5, 2019, 04:35 PM IST
INDvsAUS: विराटच्या झुंजार शतकामुळे भारताचा डाव सावरला title=

नागपूर : विराट कोहलीच्या झुंजार शतकामुळे दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा डाव सावरला आहे. विराट कोहलीचं वनडे क्रिकेटमधलं हे ४०वं शतक होतं. विराट वगळता कोणत्याही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही. भारताची अवस्था एकवेळी १७१/६ अशी झाली होती. पण विराटनं भारतीय खेळीला आकार दिला. 

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. टॉस जिंकलो असतो तर आम्हालाही फिल्डिंगच करायची होती, असं भारताचा कर्णधार विराट कोहली टॉसवेळी म्हणाला. २ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये २-०नं पराभव झाल्यानंतर पहिल्या वनडेमध्ये भारतानं ६ विकेटनी दणदणीत विजय मिळवला. या मॅचमध्ये धोनी आणि केदार जाधव यांनी नाबाद १४१ रनची भागिदारी करून भारताचा विजय सोपा केला होता. आता दुसऱ्या वनडेमध्येही विजय मिळवून सीरिजमध्ये २-०ची आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

दुसऱ्या मॅचमध्ये भारतानं टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये २ बदल करण्यात आले आहेत. शॉन मार्श आणि नॅथन लायन यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. 

भारतीय टीम :  रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कॅप्टन),  अंबाती रायुडू,  महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया टीम : उस्मान ख्वाजा, अ‍ॅरोन फिंच (कॅप्टन), मार्कस स्टोइनिस, पीटर हँडस्कोम्ब, ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श,  अ‍ॅलेक्स केरी,  नॅथन कुल्टर-नाइल, पॅट कमीन्स, अ‍ॅडम झम्पा, नॅथन लायन 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा