IndvsAus Test: ऑस्ट्रेलियाची टीम ऑलआऊट, भारताकडे इतक्या रन्सची आघाडी

पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॉलर्सची शानदार कामगिरी

Updated: Dec 18, 2020, 06:08 PM IST
IndvsAus Test: ऑस्ट्रेलियाची टीम ऑलआऊट, भारताकडे इतक्या रन्सची आघाडी title=

एडिलेट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एडिलेड येथे सुरु असलेल्या पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी एकूण 15 विकेट पडल्या. भारताने पहिल्या डावात 244 धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 191 धावा करू शकला. भारतीय गोलंदाजीने पहिल्या डावात उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर 53 धावांची आघाडी मिळविली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 1 गडी गमावून 9 धावा केल्या. भारताकडे आता 62 धावांची लीड आहे. मयंक अग्रवाल 5 वर तर जसप्रीत बुमराह शुन्यावर खेळत आहे.

दुसर्‍या डावात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवालची जोडी ओपनिंगसाठी उतरली. पहिल्या डावात खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या पृथ्वीला दुसऱ्या डावात फक्त 4 रन करता आले. 

पहिल्या डावात मयांक अग्रवालने 17, पुजाराने 43, कोहलीने 74, राहणेने 42, हनुमा विहारीने 16, साहने 9, अश्विनने 15, उमेश यादवने 6 तर बुमराने नाबाद 4 रन केले. 

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 53, हेजलवूडने 1, कमिन्सने 3, नाथनने 1 विकेट घेतली. 

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून मॅथिव वेडने 8, जोई बर्नने 8, मार्नसने 47, स्मिथने 1, हेडने 7, कॅमरॉनने 11, टीम पेनीने 73, मिचेल स्टार्कने 15, नाथनने 10 तर जोश हेडलवूडने 8 रन केले.

पहिल्या डावात भारताकडून उमेश यादवने 3, बुमराहने 2, अश्विनने 4 विकेट घेतल्या.

भारतीय टीम:

मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृध्दिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया टीम:

जो बर्नस, मॅथ्यू वेड, मार्नस लॅबुशेने, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, टिम पेन (कर्णधार / विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन ल्यॉन आणि जोश हेजलवुड.