रोमँटिक डिनर डेटवर Hardik Pandya आणि Natasa Stankovic फोटो व्हायरल

ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध टीम इंडियाला टी२० मालिका जिंकण्यासाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya)ने महत्त्वाची भूमिका बजावली

Updated: Dec 18, 2020, 02:54 PM IST
रोमँटिक डिनर डेटवर Hardik Pandya आणि Natasa Stankovic फोटो व्हायरल title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध टीम इंडियाला टी२० मालिका जिंकण्यासाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya)ने महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडिया अजूनही टेस्ट सीरीजसाठी ऑस्ट्रेलियात आहे. तर हार्दिक पांड्या भारतात परतला आहे. आपल्या मुलाच्या जन्मानंतर काही वेळाने हार्दिक आयपीएल खेळण्यासाठी दुबईत परतला. ज्यानंतर लगेच त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा होता.

आपल्या मुलाला ४ महिन्यानंतर हार्दिक पांड्या  (Hardik Pandya) भेटला, तेव्हा तो खूप भावूक झाला होता. हार्दिकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलासोबत फोटो शेअर केला. आता हार्दिक आपला मुलगा अगस्त्य आणि त्याची फियान्सी नताशा यांना वेश देत आहे. या दरम्यान नताशा आणि हार्दिक यांचे डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी नताशा स्टेनकोविकने (Natasa Stankovic) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते.  ज्यात हार्दिक आणि नताशा एक क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसले. हार्दिकचे फोटो नताशाने आपल्या फोटो स्टोरीवर शेअर केले, आणि लिहिलं, माय डिनर डेट. नंतर नताशाच्या या पोस्टला हार्दिकने आपल्या पोस्टवर शेअर केलं.

हार्दिकचा मुला अगस्त्यच्या जन्माच्या एका महिन्यानंतर हार्दिक पांड्या आयपीएल खेळायला दुबईला गेला. जेथे पाचव्या वेळेस आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा तो भाग बनला. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळणारी टीम इंडियात तो सामिल झाला. भारत वनडे सीरीजमध्ये १-२ ने हारला आणि टी-२० सीरीजमध्ये २-१ने जिंकला, मात्र या दोन्ही सीरीजमध्ये पंड्याने जोरदार प्रदर्शन केलं.