मुंबई : आयपीएलचा (IPL) पुढचा हंगाम आणखी दणक्यात खेळला जाणार आहे. याचं कारण म्हणजे 2022 मध्ये दोन नवीन संघ भारताच्या या मेगा टी 20 लीगमध्ये खेळताना दिसतील. नवीन फ्रँचायझी घेण्यासाठी लिलाव कधी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
आयपीएल 2022 चा (IPL 2022) हंगाम 8 ऐवजी 10 संघांसह खेळला जाईल. नवीन दोन संघांसाठी बोली 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे याच तारखेपासून म्हणजे 17 ऑक्टोबरपासून युएई (UAE) आणि ओमानमध्ये टी -20 विश्वचषक (T20 World Cup) देखील सुरू होत आहे. त्याचवेळी आयपीएलच्या दोन नविन संघांसाठीची बोली दुबई किंवा मस्कतमध्ये होईल
New IPL team auction to take place on October 17
Read @ANI Story | https://t.co/V9imrX0wXn#IPL2021 pic.twitter.com/v9VzmNmMaU
— ANI Digital (@ani_digital) September 14, 2021
बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नविन टीम घेणारी कंपनी 75 कोटी रुपये देऊन बोली दस्तऐवज खरेदी करू शकते. याआधी नवीन संघांची मूळ किंमत 1700 कोटी रुपये ठेवण्यावर विचार केला जात होता, पण आता मूळ किंमत 2000 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये दोन नविन टीमसाठी अहमदाबाद (Ahmedabad), लखनऊ (Lucknow), इंदौर (Indore), कटक (Cuttack), गुवाहाटी (Guwahati) आणि धर्मशाला (Dharamsala) ही शहरं इच्छूक आहेत.