Rape Case Indian Origin Cricketer: ऑस्ट्रेलियामधील भारतीय वंशाचा क्रिकेटपटू निखिल चौधरी अडचणीत सापडला आहे. निखिलने एका ऑस्ट्रेलियन महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आळा आहे. निखिलने हे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे. मात्र आता या प्रकरणामध्ये टाउन्सविले जिल्हा कोर्टामध्ये खटल्याची सुनावणी सुरु झाली आहे.
27 वर्षीय निखिल बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स संघाकडून खेळतो. ज्या प्रकरणामध्ये सध्या निखिल कायद्याच्या कचाट्यात सापडलाय ते प्रकरण मार्च 2021 मधील आहे. निखिल टाउन्सविले येथील एका नाइट स्ट्रीप क्लबमध्ये नाईट आऊटसाठी गेले होता. यावेळी त्याने एका महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या मित्रांनी जिल्हा कोर्टामध्ये दिलेल्या जबाबानुसार, आपण पीडितेला रडताना पाहिलं. तिची चौकशी केली असता तिने रडत रडतच तिच्यावर बालात्कार झाल्याची माहिती दिली. पीडितेवर निखिलने कारमध्ये बालात्कार केल्याचा दावा त्या रात्री घटनास्थळी उपस्थित असलेल्या या तरुणीच्या मित्रांनी केला आहे. मात्र निखिलने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
पीडितेच्या वकिलांनी निखिलने कारमध्ये पीडितेवर बलात्कार केल्याचा दावा केला. ही घटना फ्लिंडर्स स्ट्रीट मार्गावर झाली. पीडितेवर निखिलने बळजबरी करत तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. या साऱ्या झटापटीमध्ये महिला जखमी झाली आणि मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याचा दावा पीडितेच्या वकिलांनी केला आहे. मात्र निखिलच्या वकिलांनी या महिलेबरोबर जे काही घडलं ते सहमतीने घडल्याच्या मुद्द्यावरुन कोर्टासमोर युक्तीवाद केला.
जिल्हा कोर्टामध्ये झालेल्या युक्तीवादानुसार, निखिल चौधरी आणि 20 वर्षीय पीडितेची ओळख द बँक नाइट क्लबमधील डान्स फ्लोअरवर झाली. दोघांनी एकत्र डान्स केला आणि नंतर एकमेकांचे चुंबनही घेतले. त्यानंतर रात्री 3 वाजण्याच्या आसपास निखील आणि पीडिता कारमध्ये बसून निघून गेले. काही वेळापूर्वी ओळख झालेल्या तरुणाबरोबर पीडितेला जाताना पाहून आम्हाला चिंता वाटू लागली, असं या तरुणीच्या मित्रांनी सांगितलं. थोड्यावेळाने कार परत आली. त्यानंतर एका मित्राने कारच्या खिडकीच्या काचेवर जोरात हात मारला तेव्हा दरवाजा उघडला आणि पीडिता रडत रडतच कारच्या बाहेर आली. माझ्यावर बलात्कार करण्यात आल्याचं पीडितने मित्रांना सांगितलं.
पीडितेवर कथित बलात्कार झाल्यानंतर काही तासांमध्ये तिची वैद्यकीय चाचणी करणाऱ्या नर्स निकोल एटकेनचाही जबाब नोंदवण्यात आला. या नर्सला पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी संमतीने एकमेकांचं चुंबन घेतलं होतं. मात्र शरीरसंबंध ठेवण्यास पीडितेने सहमती दिलेली नव्हती. पीडितेच्या गुप्तांगामधून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याची माहितीही नर्सने दिली.
23 मे रोजी पहाटे मुलीचा फोन आला होता असं पीडितेच्या आईने कोर्टाला सांगितलं. ती फार पडत होती आणि मला मारहाण झाली आहे, असं म्हणत होती. तिने फोन केला तेव्हा ती पोलिसांबरोबर होती आणि रुग्णालयात जात होती असंही आईने सांगितलं. "माझ्या मुलीने ती एका मुलाला भेटल्याचं सांगितलं. त्यानंतर ती त्याच्या कारमध्ये बसली. यानंतर तो तिच्या मागेच लागला. मी तिला विचारलं त्याने तुला स्पर्श केला का? तेव्हा ती जोरात रडत 'त्याने प्रयत्न केला' असं म्हणाली," अशी माहिती पीडितेच्या आईने कोर्टाला दिली.