#ICCAwards : सब अवॉर्ड्स लेगा ये तेरा कोहली....! सोशल मीडियावर मीम्सना उधाण

 वार्षिक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. 

Updated: Jan 23, 2019, 12:38 PM IST
#ICCAwards : सब अवॉर्ड्स लेगा ये तेरा कोहली....! सोशल मीडियावर मीम्सना उधाण  title=

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा उत्साह आणत अगदी कमी वेळात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या क्रिकेटर विराट कोहली याच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल यांच्याकडून देणाऱ्या येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये खेळाडूंच्या वार्षिक कामगिरीचा आढावा देत त्यांच्या नावे पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. 

आयसीसीकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांपैकी पाच महत्त्वाच्या पुरस्कारांवर विराटचं नाव कोरलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर, टेस्ट टीम कॅप्टन ऑफ द इयर अशा पुरस्कारांसह इतरही काही पुरस्कारांचा समावेश आहे. 

विराटच्या नावे या पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यानंतर आयसीसीच्या ट्विटर पेजवरुन त्याचा एक व्हिडिओसुद्धा पोस्ट करण्यात आला, ज्यानंतर त्याच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. 

कोणी सोशल मीडियावर विराट कोहलीचा फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केला जात होता, तर कुठे भन्नाट आणि विनोदी अशा मीम्सना उधाण आलं होतं. विनोदबुद्धी आणि विराटच्या वाटयाला आलेलं हे घवघवीत यश या गोष्टी अधोरेखित करत हे मीम्स साकारण्यात आले आहेत. ज्यामध्ये चित्रपटांतील लोकप्रिय संवादांचाही धमाल वापर केल्याचं पाहायला मिळत आहे. 'ODI का, टेस्ट का सबका बदला लेगा रे तेरा कोहली...', 'आयसीसी विराटला म्हणतंय, मालिक जितना था (अवॉर्ड) सब लाया हूँ' हे असे मीम्स सध्या अनेकजण पोस्ट करत असून विराटच्या यशाचा आनंद एका वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जात आहे.