...और ये बेहतरीन शॉट; 'क्वारंटाईन प्रिमीयर लीग'मध्ये शिखऱ धवनची फटकेबाजी

पाहा त्याची ही फटकेबाजी 

Updated: Apr 23, 2020, 02:07 PM IST
...और ये बेहतरीन शॉट; 'क्वारंटाईन प्रिमीयर लीग'मध्ये शिखऱ धवनची फटकेबाजी  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : Coronavirus कोरोना विषाणुमुळे संपूर्ण यजगभरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या या विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही पाहायला मिळत आहे. देशातील याच परिस्थितीचा आढावा घेत काही दिवसांपूर्वी देशव्यापी लॉकड्ऊनची घोषणा करण्यात आली. ज्यानंतर बहुतांश क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले. अगदी क्रीडा विश्वही काही काळ थंडावल्याचं पाहायला मिळत आहे. पण, या परिस्थितीत खेळाडू मात्र काही केल्या शांत बसत नाही आहेत, हे अनेकदा स्पष्ट होत आहे. 

क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघात गब्बर म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन लॉकडाऊन आणि क्वारंटाईनच्या या काळात त्याच्या कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करत आहेच. सोबतच तो चक्क घरातल्या घरात क्रिकेटही खेळत आहे. 

सोशल मीडियावर खुद्द शिखरनेच याविषयीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो आणि त्याचा मुलगा झोरावर दोघंही क्रिकेट खेळताना दिसत आहेत. 'क्वारंटाईन प्रिमीयर लीग', असं कॅप्शनमध्ये लिहित धवनने लेकासोबतच्या धमाल क्रिकेट स्पर्धेची झलक चाहत्यांच्या भेटीला आणली आहे. 

 
 
 
 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

 

झोरावरच्या गोलंदाजीवर, त्याच्या वडिलांची म्हणजेच शिखर धवनची ही फटकेबाजी पाहताना या क्वारंटाईन प्रिमीयर लीगमध्येही धवन चांगलाच फॉर्ममध्ये आहे, असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पाहिला का, हा धवन विरुद्ध धवनमध्ये रंगलेला क्रिकेट सामना?