विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं वनडे सीरिज २-१नं जिंकली आहे. तसंच भारतानं ऑस्ट्रेलियाच्या रेकॉर्डशीही बरोबरी केली आहे.
श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर भारतानं दोन देशांमध्ये झालेल्या लागोपाठ ८ वनडे सीरिज जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. याआधी ऑस्ट्रेलियानं २००९-१० यावर्षी लागोपाठ ८ वनडे सीरिज जिंकल्या होत्या.
२०१६ साली झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सीरिजपासून भारताच्या या सीरिज विजयांना सुरुवात झाली होती. त्यानंतर भारतानं न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आता पुन्हा एकदा श्रीलंकेला धूळ चारली आहे.
दोन देशांमध्ये होणाऱ्या वनडे सीरिज लागोपाठ जिंकण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजनं १९८० ते १९८८ या कालावधीमध्ये लागोपाठ १५ वनडे सीरिज जिंकल्या होत्या.