आता T20 World Cup लांब नाही, टीम इंडियाचे 'हे' तीन ब्रह्मास्त्र कमाल करणार!

9 वर्षांची प्रतिक्षा संपणार, रोहित शर्माचे तीन ब्रम्हास्त्र....

Updated: Sep 30, 2022, 12:35 AM IST
आता T20 World Cup लांब नाही, टीम इंडियाचे 'हे' तीन ब्रह्मास्त्र कमाल करणार! title=

T20 World Cup : टीम इंडिया T20 World Cup मधील अभियानाला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात करणार. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर (Ind VS Pak) होणार असल्याने आता जगभरातील क्रिडाप्रेमींच्या नजरा या सामन्यावर लागल्या आहेत. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांना भिडतील.

भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताची फास्ट बॉलिंगमध्ये थोडा बदल केल्यास भारतीय संघ T20 World Cup दावेदार देखील मानला जातोय. अशातच आता भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर गेल्याने टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढलंय. मात्र, भारताकडे तीन ब्रम्हास्त्र असल्याने रोहित शर्माने (Rohit Sharma) सुटकेचा श्वास घेतलाय.

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारताचा सर्वात मोठा सामना विजेता ठरू शकतो. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये हार्दिक पांड्या मोठी भूमिका बजावू शकतो. जेव्हा तुम्हाला एखादी मोठी स्पर्धा जिंकायची असते तेव्हा तुम्हाला नेहमी संघासोबत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्या खेळाडूंची गरज असते, ती कामगिरी हार्दिक चोखपणे पार पाडू शकतो.

हार्दिक पांड्या आपल्या बॅटने आणि बॉलने कमाल दाखवू शकतो. भारताला अखेरच्या षटकात चांगल्या धावांची गरज असते. त्यावेळी पांड्या फिनिशरची भूमिका साकारतो. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या देखील उभारता आली आहे.

 विराट कोहली

आगामी वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार रोहित शर्माचं सर्वांत मोठं ब्रम्हास्त्र ठरण्याची शक्यता आहे. विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात विराटने आपला क्लास दाखवली. अफगाणिस्तानविरुद्धच्या आशिया कप सामन्यातही शतक झळकावले. या सामन्यात विराट कोहलीने 122 धावांची स्फोटक खेळी खेळली. 

टी-20 विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विराट कोहली टीम इंडियाला मजबूत करेल. त्याचबरोबर गगनचुंबी षटकार खेचण्यात देखील विराट तरबेज आहे. तर संकटाच्या काळात विकेट धरून ठेवण्यात विराटचा हात कोणीच धरू शकत नाही.

 सुर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) रूपाने भारताला असा स्फोटक फलंदाज मिळाला आहे, जो मैदानात 360 अंशात फटकेबाजी करू शकतो. सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारताचा सर्वात मोठा सामना विजेता ठरू शकतो. भारताचा एबी डिव्हिलियर्स म्हणून हळूहळू सुर्याची ओळख होत आहे.

संघ अडचणीत असताना देखील रन रेट टिकवून ठेवण्याचं काम सुर्यकुमार चोखपणे करू शकतो. तर गरजेच्या वेळी मैदानात येऊन परिस्थितीनुसार फलंदाजी देखील तो करू शकतो. त्यामुळे सुर्यकुमार संघात असल्याने संघातील 4 नंबरची जागा म्हणजेच युवराज सिंगची जागा भरली, असं म्हणणं वागवं ठरणार नाही.

T20 World Cup मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान हे संघ असणार आहेत. तसेच श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ 16 ऑक्टोबरपासून पात्र ठरण्यासाठी खेळणार आहेत. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे एकूण 10 टीममध्ये हा World Cup होणार असल्याने चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.