ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणं सोपं नसेल - सौरव गांगुली

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या सीरिजसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 14, 2017, 12:27 PM IST
ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणं सोपं नसेल  - सौरव गांगुली   title=
File Photo

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या सीरिजसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाने केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर सर्वांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरोधातही आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा टीमचा प्रयत्न असणार आहे.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाविरोधातील आगामी पाचही वन-डे मॅचेसची सीरिज भारत जिंकेल. मात्र, ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणं सोपं नसेल.

स्वदेशात भारताला पराभूत करणं कठीण आहे. मात्र, श्रीलंकेविरोधात ज्या प्रकारे ५-०ने विजय मिळवला त्याचप्रमाणे यश मिळणे कठीण आहे असेही मतं सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे.

सौरव गांगुलीने निवड समितीच्या कामगिरीचं समर्थन केलं आहे. त्याने म्हटलं की, २०१९ च्या क्रिकेट वर्ल्डकपसाठी निवड समिती चांगला प्रयत्न करत आहे. आपल्याकडे तयारीसाठी चांगला वेळ आहे. सर्वांना संधी मिळाली पाहिजे. टीम तयार करण्यासाठी प्रत्येकाला संधी दिली पाहिजे.